Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाशहरात आज सापडले ६२९ रुग्ण; चिखलीतील नगरसेवकांनी कोरोना विरोधात थोपटले दंड ;...

शहरात आज सापडले ६२९ रुग्ण; चिखलीतील नगरसेवकांनी कोरोना विरोधात थोपटले दंड ; संसर्ग होऊ देणार नाही

चिखली : पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णसंख्या आता दररोज 600 ने वाढत आहे. गेल्यावर्षी सारखे कोरोनाचा विळख्यात शहर सापडत आहे. भोसरी आणि चिंचवड विधान सभा मतदार संघामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रभागस्तरावर काम करत आहेत.

जाधववाडी, राजेशिवाजी नगर, बोऱ्हाडेवाडी हा भोसरी विधानसभा मतदार संघातील मोठा प्रभाग आहे. येथे महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील हजारो गरीब कष्टकरी लोक राहतात. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राहुल जाधव आणि नगरसेविका अश्विनीताई जाधव यांनी संपूर्ण प्रभागात लोकजागृती आणि प्रत्यक्ष कृती द्वारे कोरोना विरोधात दंड थोपटले आहेत.

 

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी सांगितले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील माझा प्रभाग विविध भारती आहे. सेक्टर १६ प्राधिकारण तसेच कुदळवाडी, जाधववाडी मधील नागरिक हे मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात. गेल्यावर्षी आमच्या प्रभागात सामाजिक संसर्गामुळे प्रशासनाने कठोर निर्बंध लादले होते. त्या काळात आम्ही जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला याचे वितरण केले. माझे कार्यालय आणि रुग्णवाहिका 24 तास सेवेसाठी ठेवली आहे.

 

या परिसरातील नगरसेविका अश्विनीताई जाधव आणि जनसेवक संतोषदादा जाधव यांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाचा सामाजिक संसर्ग होणार नाही, यासाठी प्रभागात अथक काम करा असे आदेश दिले आहेत. राजे शिवाजीनगर, रंगनाथ नगर, पंतनगर, वडाचा मळा, बोऱ्हाडेवाडी सह संपूर्ण जाधववाडी परिसरात महाराष्ट्र आणि उत्तर भारतातून आलेल्या कष्टकऱ्याची वस्ती आहे. त्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात जंतूनाशकाची फवारणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी आमच्या प्रभागात मोठा संसर्ग झाला होता. संतोष जाधव यांना ही कोरोना झाला आणि ते मनपाच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले. सरकारने लॉकडाऊन जाहीर केले तर प्रभागातील हातावर पोट असलेल्या लोकांची चूल विझू देणार नाही असे अश्विनीताई जाधव यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय