Thursday, August 11, 2022
Homeजिल्हाआदिवासी मुलीवर अत्याचार व 5 जणांची हत्या करणा-या आरोपींना तात्काळ फाशी द्या...

आदिवासी मुलीवर अत्याचार व 5 जणांची हत्या करणा-या आरोपींना तात्काळ फाशी द्या : राजेश धुर्वे राज्य उपाध्यक्ष

spot_imgspot_imgspot_imgspot_img

तहसीलदार धारणी जिल्हा अमरावती यांना निवेदन 

अमरावती : नेमावर जि. देवास(मध्य प्रदेश) येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या व परिवारातील 5 सदस्यांचा खून करणाऱ्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र चौहान व इतरांना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे  यांनी भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल मध्यप्रदेश, मुख्यमंत्री मध्यप्रदेश यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दिनांक 2 जून 2021 रोजी तहसीलदार धारणी जिल्हा अमरावती यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश राज्यातील देवास जिल्ह्याच्या नेमावर या गावात गावातीलच हुकूमशहा स्थानिक नेता, नराधम वृत्तीचा सुरेंद्र चौहान व त्याच्या अन्य साथिदारांनी आदिवासी समाजातील एकाच परिवारातील 5 सदस्यांचा निर्घृण खून करून सामुहिक हत्याकांड घडवून आणले. आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने स्वत:च्याच शेतात 10 फूटाचे खड्डे करून, सर्व प्रेतांची विल्हेवाट लावली. या घटनेने संपूर्ण देशाची मान शरमेने झुकली. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या नराधम, बदमाशांना निर्भया खटल्याप्रमाणेच तात्काळ फाशी देण्यात यावी. जेणेकरून अशा अमानवी, क्रूर घटनांना पायबंद बसेल. 

देशात आदिवासी समाजावर दिवसेंदिवस बलात्कार, अत्याचार, अन्याय, खून यांसारखे अमानवी प्रकार वाढतच आहे. मागील 5-6 दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्याच्या नेमावर या गावातील खूनी, नराधम भामटा सुरेंद्र चौहान याने आदिवासी समाजातील मुलींवरील प्रेम प्रकरणातून मुलीसह अन्य अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या आईसह लहान बालक असे मिळून 5 सदस्यांचा अत्यंत क्रौर्यपणे खून केला. आणि प्रेते लवकर कुजावित म्हणून युरीया खताचा वापर केला. तब्बल दीड महिन्यानंतर सदर घटना ऊघडकिस आली. देशात सर्वांना समान न्याय या तत्वावर आदिवासी मुलींना (समाजाला) न्याय मिळवून देण्यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रैक कोर्टात चालून नराधम, खूनी, बलात्कारी सुरेंद्र चौहानसह त्याला मदत करणाऱ्या इतरांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी.अशी मागणी राज्य उपाध्यक्ष राजेश धुर्वे बिरसा फायटर्स यांनी भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल मध्यप्रदेश, मुख्यमंत्री मध्यप्रदेश यांच्या कडे केली आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय