Friday, May 17, 2024
Homeग्रामीणतोत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी : सुशिलकुमार...

तोत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी : सुशिलकुमार पावरा

रत्नागिरी : तोत्के वादळामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटाचा  सामना करत असताना रविवारी तोत्के  वादळामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. समुद्र  किनारपट्टीवरील लोक गेली 2 दिवस जीव मुठीत घेऊन जगत आहेत. कोरोनावर उपाययोजना करत असताना आता प्रशासनाने तोत्के वादळामुळे झालेल्या नुकसान कडेही लक्ष देऊन पडझड, नुकसान, रस्ते मोकळे करणे, धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतरण करून इतर आवश्यक मदत करावी. अनेकांच्या घरांचे, गुरांचे गोठे, इमारत छताचे नुकसान झाले आहे. फळे देणारी झाडे उन्मळून पडली आहेत, झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. घराजवळ लावण्यात आलेल्या मोटरसायकल व इतर वाहनांवर झाड कोसळल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. हवामानाच्या बदलामुळे आंबा उत्पादन कमी झाले आहे. तिस-या टप्प्यातील आंबा तयार होत असताना तोफे वादळामुळे पीक वाया गेले आहे. काही ठिकाणी आंबा झाडे पळली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने तात्काळ कृषी विभागाला नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगण्यात यावे. 

फळ पिक विमा योजनेअंतर्गत विमा लाभ मिळावा. रविवार आलेल्या तोत्के  वादळामुळे ठिक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा तात्काळ  पंचनामा करून नुकसान ग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सुशिलकुमार पावरा यांनी कोकणातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कडे केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय