माळशिरस : जांबुड गावात रोज राजरोसपणे अवैद्य दारू, मटका जुगार चालू आहेत. अवैद्य दारू विकून व जुगार विक्रेते मालामाल तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना रोजगार नाही, तळीरामंच्या घरी रोज शिमगा त्यात तळीराम ऊसतोडणीच्या ऊचली व खाजगी सावरकर यांच्याकडुन व्याजाने पैसे घेऊन सगळा पैसा दारू व जुगारावर घालवत आहेत. त्यामुळे तळीरामंच्या घरी संसार मात्र देशोधडीला लागले, घरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने लेकर बाळांवर ऊपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व थांबवण्यासाठी जांबुड गावातील लोकांचे हित लोकसुरक्षा व जनकल्याण हेतु, आकलुज वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना आज दिनांक 1 ऑक्टोबर 2020 गावातील अवैद्य धंद्याना अळा घालण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन पाहुन पुढील तपास करून संबंधित अवैद्य धंद्ये चालवणार व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी दिले आहे.
यावेळी उपस्थित हिंदुस्थान प्रजा पक्षाचे राज्य प्रवक्ते तुकारामदादा शेंडगे, युवा कार्यकर्ते अभिमान नाईकनवरे, पांडुरंग फुले, जयदेव ढमढेरे, बलराज झंजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.