Friday, May 3, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात लक्षवेधी आंदोलन

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात लक्षवेधी आंदोलन


कोल्हापूर
 : कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जिल्हा परिषदेसमोर तीव्र निदर्शने करण्यात येत आली.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दि. २५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या इयत्ताा ५ वी चा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्या मुख्याध्यापक, प्राचार्याकडून आपापल्या शाळेची माहिती पाठवावी असा आदेश दिला होता. याच आदेशात सदरची माहिती न पाठविल्यास संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य, लिपिक यांचे माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर महिन्याचे वेतन स्थगित करण्यात येईल अशा प्रकारची असे म्हटले आहे. या आदेशाविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना वेतन कपात करण्याचा अधिकार नाही, असे शैक्षणिक व्यासपीठाने म्हटले आहे. पेन्शन धारकांच्याकडून प्रॉव्हिडंट फंड रकमांंसाठी हजारो रूपये वसूल केले जात आहेत असूूून आजपर्यंत येथे लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप व्यासपीठाने केला आहे. तसेच या प्रकरणाचा चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आंदोलन शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, संस्था चालक संघाचे व. ज. देशमुख, जयंत आसगावकर, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, टीडीएफ चे राजेश वरक, शिक्षक सेवक संघाचे दादासाहेब लाड, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे,  महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षक संघ अध्यक्ष प्रा. विनय पाटील, डी. बीत्र पाटील शैक्षणिक विचार मंचाचे व्ही. जी. पोवार, आर वाय. पाटील, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे नेते प्रभाकर आरडे, डी. एम. पाटील आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय