पुणे : जून 2020 साली, निसर्ग चक्रीवादळामुळे, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील, आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या हिरड्यांचे मोठे नुकसान झाले होते. याविषयी पंचनामे झाले होते परंतु ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे भर पावसात शेकडो हिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्धार प्रतिज्ञा घेत राज्य सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. (Pune)
मागील चार वर्षे किसान सभा व हिरडा उत्पादक शेतकरी, लोकशाही व संविधानिक मार्गाने लढत आहे. ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील सुमारे ४० पेक्षा अधिक गावात, शेकडो हिरडा उत्पादक शेतकरी महिला- पुरुषांनी, निर्धार प्रतिज्ञा घेवून,हिरडा नुकसान भरपाई मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने लढण्याचा निर्धार केला आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये सात दिवसांचे उपोषण मंचर प्रांत कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने करण्यात आले होते. यादरम्यान गावागावात सुद्धा आंदोलने झाली होती. याची दखल घेत राज्यशासनाने, दि.12 मार्च 2024 रोजी हिरडा नुकसान भरपाई देण्याविषयी शासन निर्णय काढला आहे. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. या पुढील काळात किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे. (Pune)
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, तमाम हिरडा उत्पादक शेतकरी बांधवाना, व्यक्तिगत वा सामूहिक निर्धार प्रतिज्ञा घेऊन, दि.12 मार्च 2024 रोजी शासनाने काढलेल्या शासननिर्णयाचे जाहीर वाचन करावे. असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील,शेकडो हिरडा उत्पादक महिला-पुरुष यांनी गावाच्या पातळीवर निर्धार प्रतिज्ञा घेतली. (Pune)
जांभोरी, पोखरी, चिखली, फलोदे, कोंढवळ, तेरुंगन, म्हातारबाचीवाडी, गोहे खु,पाटण, पिंपरी, कोंढवळ, कुशिरे बु., कुशिरे, भोईरवाडी, आघाने, न्हावेड, म्हाळुंगे, बोरघर, माळीन, आडवीरे, असाने, घोडेगाव, निगडाले, आहुपे, पिंपरगणे, अजनावले, तळेचीवाडी, घाटघर, फांगुळ गव्हाण, खडकुंबे, उसरान यागावात लोकांनी उस्फूर्तपणे निर्धार प्रतिज्ञा घेतली.
हिरडा नुकसान भरपाई देण्याविषयीं, शासनाने काढलेल्या शासननिर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास ऐन श्रावण महिन्यात तीव्र आंदोलनास सुरुवात होईल असा निर्धार या प्रतिज्ञेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
किसान सभेच्या या निर्धार प्रतिज्ञा गावोगावी लोकांनी घेण्यासाठी, किसानसभेचे,डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, कृष्णा वडेकर, लक्ष्मण जोशी, अशोक जोशी, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, कोंडीभाऊ बांबळे, संदीप शेळके, बाळू कोंढवळे, कावजी तिटकारे, अशोक पारधी, चिंतामण लांघी, नारायण वायाळ यांनी आवाहन केले होते.
Pune
हेही वाचा :
जगातील पहिली CNG बाईक प्रदूषणमुक्त भारत ध्येय साध्य करेल – नितीन गडकरी
नाणेघाट : इतिहासाची आणि नैसर्गिक सौंदर्याची संगमभूमी
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
ब्रेकिंग : मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार ?
गावठी दारू तयार करणाऱ्या १० हातभट्ट्यांवर छापा; २ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म