Friday, May 3, 2024
Homeशिक्षणहृतिकच्या 'फायटर'चं शानदार लॅन्डिंग; बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस

हृतिकच्या ‘फायटर’चं शानदार लॅन्डिंग; बॉक्स ऑफिसवर पाडला पैशांचा पाऊस

Lमुंबई : ‘फायटर’ (Fighter) हा 2024 च्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक असून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चं लॅन्डिंग शानदार झालं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे.

‘फायटर’ या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील हृतिक-दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

फायटर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली?

‘फायटर’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, ‘फायटर’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 22 कोटींची कमाई केली आहे. आता प्रजासत्ताक दिनी आणि विकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असे म्हटले जात आहे.हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण अभिनीत ‘फायटर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज आहे. रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘फायटर’ला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय