कुत्र्याच्या नसबंदीतही टक्केवारी, भ्रष्टाचारामुळे शहरातील तरुणांचा भाजपकडून भ्रमनिरास
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला पाहिजे, असा मनापासून विचार करणारा राज्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षात कोणताही नेता नाही. भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत नविन किती प्रकल्प आणले, शहराच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज (दि.३) भाजप नेत्यांना दिले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
ते म्हणाले की, “केवळ ऑनलाईन उद्घाटने करून स्टंटबाजी करणारी ही भाजपची मंडळी आहेत.ज्या कामांमुळे शहराचा विकास होणार आहे. जनतेचे कल्याण होणार आहे, अशा कामांना भाजपच्या काळात महत्त्व न मिळता ज्या कामांमध्ये भाजपच्या लोकांचा ‘इंट्रेस’ आहे, ज्यामध्ये त्यांना कमिशन मिळाले ती कामे गेल्या पाच वर्षांत करण्याचा प्रकार घडला आहे.
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय, यापुढे ‘या’ तारखेला साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’
कुत्र्याच्या नसबंदीमध्ये साडेसहा कोटींचा भ्रष्टाचार हा वेगळाच प्रकार आहे. करोना काळात केलेल्या नसबंदीसाठी काय सोन्याची उपकरणे वापरली होती काय? असा प्रश्नही अजितदादांनी यावेळी उपस्थित केला.
शहरातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. शहर विकासासोबतच इथल्या तरुणांच्या हाताला काम आणि महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाईल.
असे अजित पवार म्हणाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांच्यासह तीनही विधानसभेचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी
पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख