Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाटचा ऐतिहासिक विजय, भाजपचा पराभव

मोठी बातमी : जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाटचा ऐतिहासिक विजय, भाजपचा पराभव

Vinesh Phogat : हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. विनेश फोगाटने भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांचा पाच हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. हा विजय केवळ विनेशसाठीच नव्हे, तर काँग्रेससाठीही विशेष आहे, कारण गेल्या 25 वर्षांत आणि पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसला या मतदारसंघातून विजय मिळवता आलेला नव्हता.

विनेश फोगाट विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह 13 उमेदवार होते, परंतु विनेशने अत्यंत जिद्दीने लढत करत 64,491 मते मिळवून 46.77% मतांची टक्केवारी मिळवली. दुसरीकडे, भाजपच्या योगेश कुमार यांना 58,728 मते मिळाली, त्यांची मतांची टक्केवारी 42.59% होती.

विनेशच्या या यशानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला अभिनंदन केले. कुस्तीपटू बजरंग पुनियाने विनेशला एक्स पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा देताना लिहिले, “देशाच्या बेटी विनेश फोगाटला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. ही लढत केवळ एका मतदारसंघासाठी नव्हती, तर बलाढ्य जुलमी शक्तींविरुद्धची होती, आणि यात विनेश विजयी ठरली.”

आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला फक्त 1,266 मते मिळाली. विनेश फोगाटचा हा विजय तिच्या राजकीय कारकिर्दीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे, आणि काँग्रेसलाही जुलाना मतदारसंघात पुन्हा एकदा आपला प्रभाव दाखवण्याची संधी दिली आहे.

Vinesh Phogat

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गरबा खेळताना प्रसिद्ध कलाकार अशोक माळी यांचा मृत्यू

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

संबंधित लेख

लोकप्रिय