Saturday, April 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयहिंदी - चिनी ,भाई - भाई ; चीनचे बुडलेले जहाज शोधायला भारताने...

हिंदी – चिनी ,भाई – भाई ; चीनचे बुडलेले जहाज शोधायला भारताने केली “ही” मदत.

चीनच्या मदतीसाठी भारताच्या नौदल विमानाचे हिंदी महासागरात सर्च ऑपरेशन जारी

नवी दिल्ली
: हिंदी महासागरात चीनचे भले मोठे मासेमारी जहाज बुडाले असून त्यातील ३९ खलाशी बेपत्ता आहेत. चीन सरकारच्या बंदर व नौकानयन विभागाने भारत सरकारला मदतीची विनंती केल्यानंतर नौदलाच्या P-81 या विमानाने ९०० सागरी मैल विशाल महासागरात तातडीने गस्त घालून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

लू पेंग युआन यू २८ या जहाजावर चीनचे ७ कर्मचारी ,१७ इंडोनेशियन,५ फिलिपिन्स नागरिक आहेत. हे मच्छिमारी जहाज असल्याची माहिती समोर आली असून दोन दिवसांपासून हे जहाज बेपत्ता आहे.



P-81 हे नौदलाचे आधुनिक जहाज असून महासागरातील आपत्कालीन मदतीसाठी हे विमान वापरले जाते .दरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स यांनी जहाजाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे मात्र त्यातील सर्व ३९ जण अद्यापही सापडलेले नाहीत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय