Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हिडिओ : लाल समुद्रात भारताकडे येणाऱ्या जहाजाचे अपहरण 

व्हिडिओ : लाल समुद्रात भारताकडे येणाऱ्या जहाजाचे अपहरण 

येमेन : येमेनमधील इराण-समर्थित हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात इस्रायली-संबंधित ‘गॅलेक्सी लीडर’ नावाचे कार्गो जहाजाचे अपहरण केले आहे. सदरचा व्हिडीओ हौथी गटाने प्रसारित केला आहे.

फुटेजमध्ये हेलिकॉप्टर मधून बंदूकधारी उतरताना दिसत आहेत, जहाजाचा ताबा घेत आहेत. व्हिडिओमध्ये हुथी बंदुकधारी आंतरराष्ट्रीय क्रूला बंदुकीच्या बळावर पकडून ठेवताना दिसत आहेत. अपहरणाच्या वेळी हे जहाज एका जपानी कंपनीला भाड्याने देण्यात आले होते.

जहाजातील 25 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हे जहाज इस्रायलशी संबंधित आहे, ते भारताकडे येत होते. हौथी बंडखोरांनी जाहीर केले आहे की, गाझा मधील नरसंहार थांबत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय समुद्र क्षेत्रात इसरायलच्या मालकीच्या व संबंधित जहाजावर हल्ले केले जातील. 

ब्रिटिशांच्या मालकीच्या आणि जपानी कंपनीकडून चालवल्या जाणाऱ्या या मालवाहतूक जहाजाचे हौथी कडून अपहरण झाल्याचे इस्रायलने सांगितले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय