Monday, May 20, 2024
Homeग्रामीणहतगडला अवैध धंदे जोरात; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

हतगडला अवैध धंदे जोरात; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.

नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र गुजरात सीमेवर सुरगाणा तालुक्यातील हतगडला अवैध धंदा राजरोसपणेजोरात चालू आहे. गावात खुलेआम धंदे चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.

दारू आणि मटका राजरोसपणे अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने चालू आहे, असे लोकांमध्ये चर्चा चालू आहे. दोन तीन वर्षांपासून हे बंद झाले होते, पंरतु आता जोमाने सुरू झाले असून शाळकरी मुले याचा बळी पडत आहेत. त्यांंचे भविष्य धोक्यात येत असून शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने धंदे बंद करण्यासाठी प्रशासन पाऊल उचलणार का? 

मटका चालविणाऱ्या विरोधात कारवाई होत नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे शासन अवैध धंदे बंद करण्यासाठी कायदा करते आणि अधिकारी मात्र सखोल चौकशी करत नाही. आता पोलिसांच्या कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय