पिंपरी चिंचवड : अभिसार फाउंडेशनच्या वाकड येथील शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हस्तव्यवसाय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इनरव्हील क्लब ऑफ पुणे मिडटाऊन व उन्नती दिव्यांग पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी संगीता कृष्णदेव गुरव स्किल इंडियाच्या व्यवसाय मार्गदर्शक यांनी प्रात्यक्षिक द्वारे विविध प्रकारच्या मेणबत्त्या, परफ्युम, फिनाईल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवणे व पालकांकडून ते करून घेतले.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांच्या अध्यक्ष विजया नखाते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या शिबिराचा उद्देश दिव्यांग मुलांच्या पालकांना व विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या शिबिरामध्ये एकूण 37 प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता त्यांना संगीता गुरव, विजया नखाते, आरती वाणी, अॅड.नीलिमा आगाशे, रमेश मुसूडगे, बालवडकर यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षिका खेडेकर मॅडम यांनी केले, आभार प्रदर्शन भाग्यश्री कापसे यांनी केले या शिबिराचे आयोजन व्यवस्थापिका शुभांगी जाधव, सौ.हांडे, ऋषी देशमुख यांनी सहकार्य केले.
– क्रांतिकुमार कडुलकर