Friday, November 22, 2024
Homeग्रामीणज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संत गाडगे महाराजांची जयंती...

ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संत गाडगे महाराजांची जयंती साजरी !

पिंपरी-चिंचवड : शहरामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड चे स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे व बारा बलुतेदार महासंघ युवा प्रदेशाध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

संत गाडगे बाबांंचे विचार आजही प्रासंगिक होत आहेत. समाजातील अस्वच्छता दूर करता करता माणसाच्या मनामधील रूढी परंपरा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अज्ञान असणाऱ्या लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे, स्वच्छतेचे समाजाला शिकवण देणे, देव देवळात नसून देव माणसांमध्ये आहे, अशा अनेक प्रकारे गाडगे महाराजांनी समाजातील नागरिकांना हा दिलेला संदेश आहे, नागरी सुरक्षा हक्क समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थी समन्वय आंदोलनचे अध्यक्ष संतोष जोगदंड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहराध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर भुजबळ, प्रहार जनशक्ती पक्ष चे शहराध्यक्ष नीरज कडू, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजेंद्र साळवे, प्रहार वाहतूक आघाडीचे विजय खडके, 

भाजपचा उपाध्यक्ष विजू जाधव, नागरी हक्क परिषदचे सचिव गिरीश वाघमारे , नवनाथ कांबळे, ओबीसी संघर्ष समितीचेे शहराध्यक्ष आनंदा कुदळे आदिसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय