Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपालकमंत्री उदय सामंत यांची, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट!

पालकमंत्री उदय सामंत यांची, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट!

या भेटीत अत्याधुनिक कक्ष उभारण्याची दिली ग्वाही!

रत्नागिरी : दि.२२ –
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देउन पाहणी केली. अत्याधुनिक कक्ष उभारणीसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले ८६४ ग्रामपंचायतीमध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे उद्घोषणा देऊन ग्रामस्थांपर्यंत संदेश पोहचला जातो. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी इतर कामकाजाची माहिती देवून प्रात्यक्षिक दाखविले.

पालकमंत्री सामंत म्हणाले, मुंबई आणि रायगडच्या धर्तीवर एक अत्याधुनिक साधनसामुग्रीने युक्त असा आपल्या जिल्ह्याचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभा करा. त्यासाठीचा संपूर्ण प्रस्ताव तयार करावा. या कक्षात आवश्यक मनुष्यबळ देखील दिले जाईल. तसेच बांधकाम विभागाकडून आवश्यक तेथे कक्षाची दुरुस्ती, नुतनीकरण, रंगरंगोटी करुन घ्यावी. त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार ज्योती वाघ आदी उपस्थित होते.


हे ही वाचा :

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय