Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणभारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे मोठे योगदान - राजेंद्र पाडवी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे मोठे योगदान – राजेंद्र पाडवी

सांगली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन राजेंद्र पाडवी जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी आरळा येथील क्रांतिवीर तंट्या मामा भील याच्या १७९ जयंती कार्यक्रमात केले.

ते पुढे म्हणाले की, आदिवासींनी इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव केले. त्यातील संथालाचा उठाव, मुंडा उठाव, कच्छमधील उठाव, कोल उठाव प्रसिद्ध आहे. तंट्या मामा इंग्रज, जमीनदार यांच्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध होता. ब्रिटिशांच्या दृष्टीने तंट्या मामा एक दरोडेखोर, चोर वाटत होते. परंतु, निमाड, बैतुल, हौशंगाबाद सातपुड्यातील पट्ट्यात शेतकरी व आदिवासीच्या रक्षण कर्ता होता. मामांनी ४०० पेक्षा अधिक दरोडे घालून गरीब लोकांना धान्य वाटले.

अन्याय, शोषण, अत्याचारविरुध्द लढण्यासाठी  हजारों तंट्या मामा जन्माला येणे आवश्यक आहे. अन्यायकारक कृषी कायदयाचाही विरोध करण्यात आला. यावेळी महेंद्र गावीत, विलास चौधरी, विश्वर चौधरी, विलास कऱ्हाळे, युवराज फसाळे, ईश्वर पारधी, सुनंदा गावीत, सुगणा पाडवी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय