Monday, May 13, 2024
Homeजिल्हाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Washim, (दि.4) : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (statue of Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज करण्यात आले. अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता. The grand equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj was unveiled by the Chief Minister

सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले. सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच आहे.

हे ही वाचा :

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार सुरक्षागृह, समाज कल्याण विभागाचा महत्वाचा निर्णय

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

शेतकऱ्यांनी शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

…तर आम्ही भाजप सोबत जाऊ, उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी तीन उमेदवार जाहीर, “हे” आहेत तीन उमेदवार

भाजपला आणखी एका बड्या नेत्याचा रामराम

मोठी बातमी : Tata motors चे दोन कंपन्यात विभाजन होणार

Dhule : धुळे पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

Amravati : अमरावती पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय