Pune : खराडी येथे आमदार बापूसाहेब पठारे युवा मंचाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवात प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणाईपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या पारंपरिक उत्सवात आनंदाने सहभाग घेतला. गोविंदा पथकांच्या उंच थरांनी वातावरणात उत्साहाचे वारे वाहत होते. बारामती जयमल्हार संघ या गोविंदा पथकाने थर रचून यशस्वीरित्या दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. तसेच, विविध गोविंदा पथकांच्या साहसाला उपस्थित नागरिकांकडून जोरदार दाद मिळाली. महोत्सवाच्या निमित्ताने मराठी सिनेअभिनेत्री मुग्धा गोडसे व बैलगाडा फेम अभिनेत्री जुही शेरकर यांनी उपस्थिती दर्शवली. (Pune)
सालाबादप्रमाणे यंदाचाही दहीहंडी महोत्सव दिमाखदार व चैतन्यपूर्ण ठरला. आमदार बापूसाहेब पठारे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्तुत्य नियोजनामुळे उत्सव व्यवस्थितरित्या पार पडला. नियोजनातील काटेकोरपणा व प्रत्येक टप्प्यावर घेतलेली योग्य काळजी यामुळे दहीहंडीचा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. नागरिकांचा सहभाग व उत्स्फूर्तता यामुळे खराडीत गोपाळकालाच्या निमित्ताने एक वेगळीच ऊर्जा व जल्लोष पसरला होता.
महोत्सवाविषयी बोलताना सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे म्हणाले, “दहीहंडी हा उत्सव केवळ परंपरेचा भाग नाही, तर तो एकतेची, सामूहिक प्रयत्नांची आणि जिद्दीची शिकवण देतो. गोविंदा पथकांनी जसे एकत्र येऊन उंच थर उभारले तसेच एकत्रित पणे खांद्याला खांदा लावून आपण सामाजिक उन्नतीचे थर उभारू शकतो.” (Pune)
“दरवर्षी दहीहंडी महोत्सवामुळे खराडीत एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. संघटनशक्ती व बंधुत्वाची भावना अजून भक्कम व्हावी, याच उद्देशाने एकत्रित येऊन हा महोत्सव साजरा केला जातो. युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी महोत्सवाचे चांगले नियोजन केले याबद्दल त्यांचेही कौतुक आहे.” असे वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार