Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडChakan : चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्याची चाळण, कामगार आणि उद्योजक परेशान :...

Chakan : चाकण एमआयडीसी मध्ये रस्त्याची चाळण, कामगार आणि उद्योजक परेशान : कामगार नेते श्री जीवन येळवंडे.

चाकण / क्रांतीकुमार कडुलकर : चाकण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री जीवन येळवंडे यांनी केली आहे. (Chakan)

चाकण एमआयडीसी परिसरात अनेक देशी आणि विदेशी बहुराष्ट्रयीय कंपन्या आहेत, याठिकाणी विविध कंपन्यांमध्ये हजारो कामगार कामासाठी आजूबाजूच्या परिसरातून कामासाठी येत असतात. मात्र यावर्षी पावसाळ्यामध्ये येथील एम आय डी सी परिसरात संपूर्ण रस्त्यांची चाळण झालेली असून रस्ते हे गाड्या चालवण्यासाठी दुचाकी चालवण्यासाठी अतिशय धोकादायक ठरत आहेत.

पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि फूटपाथ व साईडच्या पट्ट्या नष्ट झालेल्या आहेत. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. निसरडेपणा वाढलेला आहे, यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने आणि अवजड वाहनांमुळे वाहतूक विस्कळित झालेली आहे. (Chakan)

अनेक ठिकाणी रस्त्याची व्यवस्था अवघड झाली आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे. कामगार आणि उद्योजक शिफ्ट वेळेवर सुरू करू शकत नाहीत, कामगारांना कामावर येण्यासाठी अतिरिक्त एक तास लागत आहे. त्यामुळे कामगारांना आपल्या कुटुंबासाठी वेळ देता येत नसुन जास्त वेळ प्रवास आणि ट्राफिक मध्ये जात आहे. Chakan)

त्यामुळे हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी मागणी श्री जीवन येळवंडे अध्यक्ष स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांनी एका पत्राद्वारे एमआयडीसीच्या एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यांना केली आहे.

याबाबत माहिती देताना श्री जीवन येळवंडे म्हणाले की गेली दहा वर्षापासून या ठिकाणी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी वाढती रहदारी वाढते कामगार आणि वेगवेगळ्या नवीन कंपन्यांचे येणं वाढले आहे आणि त्यासाठी येणारे अवजड वाहने आणि प्रवासी वाहने पाहता येथील रस्ते हे कॉंक्रिटीकरण करून सुंदर बनवले पाहिजेत त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्हीही बाजूला बाजूला फुटपाथ असले पाहिजेत.

येथील रस्ते रुंद करून त्याची अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे व्यवस्था केली पाहिजे.तशी
गेले काही वर्षे आम्ही याची मागणी करत आहोत. एमआयडीसी आणि पीएमआरडीएचे चाकण एमआयडिसी कडे दुर्लक्ष होत आहे. येथील अनेक कंपन्यांचे अधिकारी, कामगार संघटना, वाहतूकदार संघटना यांना त्याचे प्रश्न मांडण्यासाठी PMRDA/ एमआयडीसी अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभा आयोजित करून समस्या निवारण केली पाहिजे.

तसेच आम्ही वारंवार विनंती करत आहोत की चाकण एमआयडीसी मधील विशेषता इंडूरन्स कंपनी पासून एच पी चौक आणि स्कोडा कंपनी पासून स्पाईसर कंपनीच्या चौका परिसरातील रस्ते तसेच सर्व औद्योगिक परिसरात चांगल्या रस्त्यांची आवश्यकता आहे चांगले रस्ते नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडीमुळे दीड दीड तास लोकांना घरी जायला पण वेळ लागतो आणि कामावर यायला पण वेळ लागतो त्यामुळे उत्पादन लाईनचे वेळापत्रक विस्कळित होत आहे.

रेगुलर ड्युटी होत नसल्यामुळे एक एक तास लाईन पुढे चालवण्याची वेळ उद्योजकांवर आलेली आहे या भागात परदेशी कंपन्या पण आहेत त्यामुळे चाकण एमआयडीसी मधला जो रस्त्यांचा प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

चाकण येथील वाहतूक कोंडी आणि हा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे. एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांनी तातडीने लक्ष घालावे असे राज्य सरकारने पण आदेश दिलेले आहेत.

वाहतूक कोंडी आणि रस्त्याचे प्रश्न सोडवावेत हे प्रश्न वेळेत न सोडवल्यास याविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री जीवन येळवंडे यांनी एमआयडीसी प्रशासनात दिला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय