Sunday, July 7, 2024
Homeताज्या बातम्याNarishakti Doot : महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या करा अर्ज...

Narishakti Doot : महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या करा अर्ज !

Narishakti Doot : राज्य सरकारने महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यासाठी कल्याणकारी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षे वयोगटातील, विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिलांना मिळू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

राज्य सरकारने या योजनेची घोषणा सुरू केल्यापासून राज्यातील अनेक कार्यालयात कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे. तसेच योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे. मात्र आता तुम्ही तुमच्या मोबाईल वरूनही अर्ज करू शकता.

अर्ज प्रक्रिया

अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येईल. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रांवर जाऊन करता येऊ शकतात. ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्या अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करू शकतात. अंगणवाडी सेविका हा अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. अंगणवाडी सेविकांना यासाठी प्रती पात्र लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत असेल.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा? (Narishakti Doot)

  • गुगल प्ले-स्टोअरवरून ‘Narishakti Doot’ हे ॲप डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा.
  • मोबाईल नंबर आणि terms and conditions स्वीकारून लॉग-इन करा.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Verify OTP वर क्लिक करा.
  • प्रोफाईल पूर्ण करा: अर्जदार महिलेचं नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका, नारी शक्तीचा प्रकार निवडा.
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ निवडून अर्ज भरा:
  • संपूर्ण नाव, पती/वडिलांचे नाव, जन्म दिनांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक भरा.
  • वैवाहिक स्थिती निवडा (अविवाहित, विवाहित, विधवा इ.).
  • बँक खात्याचा तपशील भरा.
  • आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का ते निवडा.

आवश्यक कागदपत्रं अपलोड करा

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड
  • स्वयंघोषणा पत्र
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अर्ज सबमिट करा आणि OTP टाकून फॉर्म सबमिट करा. अर्जाची स्थिती पाहण्यासाठी अर्ज क्रमांक मिळेल.

अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया पार पडेल. पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेसाठीच्या अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “ज्यांचं अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येतील. जर अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय