Wednesday, May 22, 2024
Homeकृषीशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पिकांवर फवारणी करणे होणार सोपे!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पिकांवर फवारणी करणे होणार सोपे!

Krushi News : शेतकऱ्यांनो, पिकांवर फवारणी करणे सोपे होणार आहे. कारण, केंद्र सरकार कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला चालना देत असून याअंतर्गत ड्रोनच्या खरेदीवर 75 टक्क्यांपर्यंत सबसिडी देत आहे.

शेतकऱ्यांव्यतिरिक्त, कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठे, कृषी उत्पादक संस्था, कृषी पदवीधर तरुण, अनुसूचित जाती/अनुसूचित जाती आणि महिला शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात.

ड्रोनवर किती सबसिडी मिळणार?

▪️ शेतकऱ्यांना ड्रोनवर 40 टक्के ते 100 टक्के अनुदान मिळत आहे. 

▪️ कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीवर 100 टक्के किंवा 10 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे. 

▪️ कृषी उत्पादक संस्थांना ड्रोन खरेदीवर 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. 

▪️ कृषी पदवीधर युवक, SC/ST प्रवर्गातील आणि महिला शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा 5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल. 

▪️ इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय