मुंबई : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Anganwadi Workers
हा लाभ कर्मचा-यांना 1 एप्रिल, 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युईटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी देण्यात येईल. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सुत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यास व याकरिता येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, ग्रॅज्युईटी लागू करा, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावे, या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे. नुकतेच तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या होत्या. त्यानंतर सरकारने आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला होता. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजूटीचा हा विजय असल्याचे बोलले जात आहे.
“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन
MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती
DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती
Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती
Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती
NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती
Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती