Monday, March 17, 2025

इथे ओशाळला महाराष्ट्र : राज्यात आणखी एक दलित हत्याकांड

लातूर : उत्तर भारतातून सातत्याने दलित, आदिवासींवरील अन्याय अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. मात्र पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातही दलित अन्याय अत्याचाऱ्याच्या घटना समोर यायला लागल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील दलित अक्षय भालेरावच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा लातूरमध्ये दलित तरुणाच्या डोळ्यात मिरपूड टाकून बेदम मारहाण करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लातूर येथील गिरीरत्न तबकाले या दलित समाजातील व्यक्तीनं गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. या तीन हजारांच्या बदल्यात व्याजापोटी 20 हजार रुपये वसूल करुनही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत या गावगुंडानं भर बाजारात तबकाले यांना काठीनं बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे आव्हाड यांचे ट्वीट ?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट म्हटले आहे की, मन सुन्न झालंय… तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड… लातूर रेणापूर : अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली.

तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला. दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली.

राज्यात दलित सुरक्षीत नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?

हे ही वाचा :

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना संधी

‘गायींची कत्तल करण्यात गैर काय ?’ मंत्री के.व्यंकटेश यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक; तर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा पलटवार

शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, 36 शिक्षण अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण आयुक्तांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र

Related Articles

- Advertisement -

Latest Articles