Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडइंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यास सर्वोतोपरी सहकार्य करणार :- डॉ. राजेश देशमुख

इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यास सर्वोतोपरी सहकार्य करणार :- डॉ. राजेश देशमुख

नदी प्रदूषण उपाय योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

आळंदी / अर्जुन मेदनकर
: तीर्थक्षेत्र देहू – आळंदी मधून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नदीत प्रदूषित सांडपाणी येऊ नये. यासाठी होत असलेल्या कामांना अधिक गती देऊन प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे सूचनादेश देऊन इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यास सर्वोतोपरी सहकार्य स्थानिक स्वराज्य संस्थाना केले जाईल अशी ग्वाही पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाय योजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपरिषद प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, जीवित नदी उपक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक शैलजा देशपांडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे, दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचेसह लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, देहू नगरपंचायत चे सर्व संबंधित मुखाधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळाचे अधिकारी,इंद्रायणी सेवा फाऊंडेशन अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सचिव दिनेश कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, कोमल काळभोर, जनार्धन पितळे, अरुण बडगुजर, दादासाहेब कारंडे, शिरीष कारेकर, डॉ. सुनिल वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी विविध शासकीय खात्यांचे नदी प्रदूषणावर केलेल्या, सुरु असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेऊन डॉ. देशमुख यांनी उपस्थितांचे समवेत सुसंवाद साधला. इंद्रायणी नदी लगत दुतर्फा असलेल्या महापालिका, ग्रामपंचायती, कॅन्टोन्मेंट बोर्ड, नंगरपरिषदाचे कामाची माहिती उपस्थित अधिकारी यांचेकडून जाणून घेत येत्या सहा महिन्यात उर्वरित आणि सुरु असलेल्या एस.टी.पी. प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन थेट नदीत सोडले जात असलेलं सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही यासाठी प्राधान्याने कामासाठी लक्ष केंद्रित करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी इंद्रायणी नदी वर प्रदूषण होऊ नये यासाठी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेत केलेले सादरीकरण पाहत त्यांनी नदीत प्रदुषित सांडपाणी येऊ नये यासाठी यंत्रणांनी संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहण्याची आवश्य्कता असल्याचे सांगितले. या बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळ, आळंदी नगरपरिषद, लोणावळा, वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी आपापल्या विभागांचा आढावा समोर मांडत बैठकीत सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, अर्जुन मेदनकर, विठ्ठल शिंदे, शिरीष कारेकर, संजय घुंडरे पाटील, जनार्दन पितळे, अरुण बडगुजर, दादासाहेब कारंडे यांचेसह उपस्थित अधिकारी यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी नदी प्रदूषण जनजागृती वर आधारित उपस्थितांनी शपथ घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रातील एसटीपीच्या कामाची माहिती देत उर्वरित कामातील अडचणींवर उपाय योजना यावर चर्चा करीत जिल्हाधिकारी यांनी नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत यात जनजागृती करून अधिकाधिक लोकसहभाग घेऊन चला जाणूया नदीला या अभियानात सर्वानी सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केले. यावेळी एसटीपी प्रकल्प कार्यान्वित होण्यातील अडचणी दूर करण्यासाठी संबंधित यांना संपर्क करून मार्ग काढन्यासह काही ठिकाणी स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेने एसटीपी साठीची जागा खरेदी केली असून तात्काळ निविदा प्रकिया सुरु करण्याचे आदेश दिले. ठराविक वेळेत सर्वानी कामे करून नदी प्रदूषण येत्या काळात होणार नाही यासाठी दक्षता घेण्यास सांगितले.



यावेळी मावळ तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायती हद्दीत सांडपाण्यावर प्रभावी उपाय योजना केल्याचे सांगत त्यांनी जिल्हा परिषदेच्या हद्दीत सर्वत्र कान्हे ग्रामपंचायती प्रमाणे गावातच सांडपाणी जिरवण्यासह पुनर्वापर केला जात आहे. यामुळे सांडपाणी नदीत जात नाही. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. कान्हे गावातील प्रकल्प इतर सर्व ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात सुरु करून उपाय योजना जिल्हा परिषदेने राबविण्यास त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीत शोषखड्ड्यांचा उपाय प्रभावीपणे राबविण्यास सांगितले. डॉ. देशमुख म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी. यात लोकसहभाग वाढवून स्वच्छता अभियान, विविध स्पर्धा, कार्यक्रम घेऊन काम करता येईल. यात व्यक्ती,संस्था, शाळा यांचा सहभाग वाढवावा. दर महा प्रयक विभागाने एक कार्यक्रम घेऊन समाजात जनजागृती करीत लोकसहभाग वाढवावा. इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यास संबंधित यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. सर्व यंत्रणांनी कामास गती दिल्यास येत्या काळात नद्यांचे प्रदूषण समस्यां रहाणार नाही असे सांगितले. पीएमआरडीए सह इतर सर्व संबंधित घटकांना पुढील बैठकांत बोलविण्याचे आदेश डॉ.देशमुख यांनी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड तर्फे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी महापालिका हद्दीतील कामांची माहिती दिली. यात एसटीपी आणि ईटीपी बाबत सविस्तर सादरीकरण केले. येत्या मार्च २०२४ पर्यंत टप्प्या टप्प्याने सुमारे ३१ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया क्षमतेचे एसटीपी सुरु होतील असे त्यांनी सांगितले. यामुळे इंद्रायणी नदीचे प्रदूषण निश्चितच कमी होईल. यावेळी अर्जुन मेदनकर, विठ्ठल शिंदे, डि. डि. भोसले पाटील, अरुण बडगुजर, शिरीष कारेकर, जनार्दन पितळे यांनी बैठकीतील चर्चेत भाग घेतला. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा माझी वसुंधरा अभियान मध्ये पुणे जिल्यात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल राज्य शासनाने सन्मान केला. त्याबद्दल आळंदी ग्रामस्थांचे वतीने त्यांना सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय