Saturday, April 20, 2024
Homeक्राईमलाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; एसीबीची धडाकेबाज कारवाई

लाचखोर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; एसीबीची धडाकेबाज कारवाई

नाशिक : येवला तालुका पोलिस स्टेशनचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिंदे हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात ३ हजाराची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे पत्नीने येवला तालुका पोलीस ठाणे येथे दिलेल्या एन सी वरून सामनेवाला यांचेवर कारवाई करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरूध्द दाखल असलेल्या एन सी व तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ४ हजार रुपय लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान येवला तालुका पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे यांनी तक्रारदार यांचे कडे ४ हजार रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन ३ हजार रूपये लाचेची रक्कम दि. ०६ जून २०२३ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दाराबाहेरील झाडाखाली स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले.

विजय शिंदे यांचेविरुध्द भ्र.प्र.का. सन १९ ८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र च्या पोलीस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक श्रीमती वैशाली पाटील करीत आहेत.

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 171 पदांची भरती; 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तरांना नोकरीची संधी

परभणी जिल्हा परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत 281 पदांची भरती; 8वी, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय