Monday, May 20, 2024
HomeNewsघोडेगाव : 'एसएफआय' चे शाळा बंद विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

घोडेगाव : ‘एसएफआय’ चे शाळा बंद विरोधात पंचायत समितीसमोर आंदोलन

घोडेगाव : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) च्या वतीने शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आंबेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर “शाळा वाचवा आंदोलन” करण्यात आले. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका शिक्षक समिती या संघटनांचे पदाधिकारी व विद्यार्थी, पालक यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी २० पटसंंख्येपेक्षा कमी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे, सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देत पंचायत समिती परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलतांना एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी म्हणाले, “राज्य सरकार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समायोजनाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरण राबवत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 1054 शाळांचा समावेश असून आंबेगाव तालुक्यातील 96 शाळा रडारवर आहेत. पैकी तब्बल 64 शाळा या आदिवासी दुर्गम भागातील आहेत. यामुळे बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असून मोठ्या संख्येने मुली शिक्षणाच्या बाहेर फेकल्या जाणार आहेत. भारतीय संविधानाने 1 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलेला मुलभूत शिक्षणाचा अधिकार पायदळी तुडविण्याचा सरकार प्रयत्न करतात आहे. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घ्यावा.”

तसेच किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु घोडे म्हणाले, शाळा बंद करणारे धोरण हे विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारणारे आहे, शाळा बंद पडल्या तर गावे ओस पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. पण ते यावर ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत..जो पर्यंत हा निर्णय शासन मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवला पाहिजे”

यावेळी एस.एफ.आय चे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, आंबेगाव तालुका सहसचिव योगेश हिले, उपाध्यक्ष रोशन पेकारी, कोषाध्यक्ष रोहिदास फलके, अरुण भांगे, आदित्य डामसे, अक्षय पोटकुले, गणेश पोटकुले, किसान सभा जिल्हा उपाध्यक्ष राजु घोडे, आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष बाळु काठे, तालुका समिती सदस्य अर्जुन काळे, शिक्षक समितीचे अध्यक्ष शेळकंदे सर, सचिव घोटकर सर तसेच ठकसेन गवारी, संतोष गवारी सर, वाजे सर तसेच पालक व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय