Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना च्या काळात जीवंत राहणे हेच मोठे आवाहन : रामचंद्र गांगुर्डे

कोरोना च्या काळात जीवंत राहणे हेच मोठे आवाहन : रामचंद्र गांगुर्डे

    जागतिक मानवजातीला आवाहन ठरलेल्या, संपूर्ण जगाला एका जीवघेण्या संकटात घेऊन   चाललेल्या कोरोना संकटावर मात  करता करता संपूर्ण जग आज  मेटाकुटीस आले आहे. अख्या जगाला सळो की पळो करुन  सोडले आहे, आज संपूर्ण जगाच्या बौद्धिक क्षमतेला एक उघड आवाहन देऊन कोरोना व्हायरस अखिल विश्वातील मानव जातीची कसोटी पाहत आहे. खरं तर लहान थोर अशा  प्रत्येक व्यक्ती समोर हे जीवघेणे आवाहन उभे आहे, अशा या कठीण काळात प्रत्येक व्यक्तीने आपला स्वतःचा जीव वाचवीने जास्त महत्वाचे आहे. कारण आज या क्षणी जिवंत राहणे हे सर्वात मोठे  आवाहन आहे.

    गेल्या चार महिन्यापासून भारत देशावर कोरोना व्हायरस चा जीवघेणा हल्ला होतो आहे, देशाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थिती बिघडत चालली आहे, याचे दूरगामी परिणाम मानवी जीवन पद्धतीवर  होणार हे नक्कीच. पुढील अनेक पिढ्यावर याचे घातक परिणाम होणार सोसावे लागणार हेही तेवढेच खरे आहे. आज आपली आरोग्य व्यवस्था आणि त्यातील नवीन बदल किती महत्वाचे आहे हेही आज प्रत्येकास प्रकर्षाने जाणवते आहे , आज देशातील अर्थ व्यवस्था कोलमडली आहे. हातावर जगणारे मजूर, कामगार यांच्या हाताला काम नसल्याने मोठ्या जीवघेण्या  संकटात आहेत. शेतकरी  नोकरवर्ग अधिकारी पदाधिकारी, व्यावसायीक, अडचणीत आहेत. शिक्षण क्षत्र आज संकटात आहे, या एका वर्षाच्या शैक्षणिक नुकसानीचे परिणाम फार मोठे आणि घातक होणार आहेत होत  आहेत. विध्यार्थी आणि शिक्षण यातील दरी प्रचंड वाढत चालली आहे, ही दरी त्या विध्यार्थ्यांला, कुटुंबाला, समाजाला आणि देशालाही परवडनारी नाही. अशा अनेकविध  क्षेत्रात अशा असंख्य अडचणी येत आहेत,अजून  येणारही  आहेत. पण तरीही या कठीण  काळात मोठा संघर्ष करणे तेवढेच महत्वाचे आहे. हेही कटू सत्य आहे,

       पण तरीही या संकटावर मात करण्यासाठी मानव सक्षम आहे, संकटे कितीही मोठी असोत, परिस्थिती कितीही कठीण असो, आवाहने कितीही संघर्षमय असोत, पण मानवाने नेहमी कठीण परिस्थितीचा सामना केलेला आहे, अविरत संघर्ष करुन संकटं खांद्यावर घेतली आहेत. याची असंख्य उदाहरने इतिहास, रामायण, महाभारत, निसर्ग, महायुद्ध, स्वातंत्र्य लढा, शुरु वीर योद्धये,शास्त्रज्ञ, संशोधक  यातून नेहमी प्रेरणा व आदर्श मिळाले आहेत. ही  प्रेरणा नेहमी मनवाने आदराने आणि सन्मानाने घेतील आहे. नक्कीच येणाऱ्या काळात कोरोना संकटा वर  मानव जिद्दीने मात करेल. आणि कोरोना विरुद्ध च्या लढयात यश मिळवेल…

     देशाने पुकारलेल्या लॉक डाऊन, आणि अन लॉक चे नियम प्रत्येक व्यक्तीने स्वतः पासून पाळने गरजेचे आहे . व्यक्तीने माझे जीवन बहुमूल्य आहे, मला जगायचे आहे,जीवन बहुमूल्य आहे, लव यु जिंदगी, save life, be positive, अशा सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या सुंदर  जीवनाकडे पाहणे हेच जिवंत जीवनाचे खरे लक्षण आहे. म्हणून या संकट काळात कमीतकमी एक वर्ष प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन वाचावायचे आहे. 2020-21 हे  वर्ष फक्त जिवंत राहण्याचा प्रयत्न करा, या एका वर्ष्याच्या कठीण काळात आपला  जीव वाचला तर उभ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वप्नवत आयुष्यातील, आपल्या कुटुंबातील, इतरांप्रती गोड  सहवासातील जीवन, आपली ध्येय, असंख्य स्वप्न,  इच्छा, अपेक्षा, पूर्ण करणे सहज शक्य आहे, स्वतःपासून सुरु झालेला हा वैचारिक बदल, नक्कीच समाज, समाजातील प्रत्यक व्यक्ती, एका नवीन जिद्दीने हे  सर्व वैभव  उभारू शकेल, कोरोना या जीवघेण्या संकटाने निर्माण झालेल्या आपल्या देशातील  आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विभागात  व इतर विभागात आलेल्या संकटावर नक्कीच मात करुन एक चांगली पिढी, चांगली जीवन पद्धतीने,  आणि चांगला आदर्शवत व प्रभावशाली भारत निर्माण करतील.

आपल्या देशातील बुद्धीजीवी  मानवाला हे सहज शक्य आहे. यासाठी जिवंत राहणे महत्वाचे आहे….           

   – प्रा.रामचंद्र गांगुर्डे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय