Saturday, May 18, 2024
Homeजिल्हास्वातंत्र्य सेनानी आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा स्मृतीदिन घराघरात साजरा करावा - सुशीलकुमार...

स्वातंत्र्य सेनानी आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा स्मृतीदिन घराघरात साजरा करावा – सुशीलकुमार चिखले

राजूर (अकोले) : स्वातंत्र्य सेनानी आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा २ मे २०२१ रोजी १७३ वा समूर्तीदिन आहे. त्यांचा स्मृतीदिन आदिवासी बांधवांनी घराघरात साजरा करावा असे आवाहन राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष तथा अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे नेते सुशिलकुमार चिखले यांनी केले आहे.

सुशीलकुमार चिखले म्हणाले की,  २ मे १८४८ रोजी ठाणे येथील कारागृहात क्रांतिकारक राघोजी भांगरे याना फाशी दिली. आज त्याचा त्यांचा स्मृती दिन आहे. डॉ. गोविंद गारे यांनी २ मे १९९८ पासून ठाणे कारागृहामध्ये हा स्मृती दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आदिवासी युवकांनी राघोजींचे विचार घराघरात पोहोचविणे गरजेचे आहेत. पुढे हा सुरू केलेला कार्यक्रम दरवर्षी कायम सुरू राहिला. मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे ठाणे कारागृहामध्ये जाऊन साजरा करू शकत नाही. तसे पत्र संघटनेने कारागृह प्रशासनाला दिले आहे.

आदिवासी समाज, संघटनांनी आपापल्या घरीच थांबून घराघरात राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन साजरा करावा असे आवाहन सुशिलकुमार चिखले तसेच संस्थेचे राज्याचे उपाध्यक्ष महेश शेळके राज्य सचिव सद्गुरु देशमुख यांनी केले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय