Sunday, May 5, 2024
Homeआरोग्यनाशिक : नेहरू नगरचे हॉस्पिटल कोविड केअर सेंंटर करा, खासदार, महापौरांंकडे डावी...

नाशिक : नेहरू नगरचे हॉस्पिटल कोविड केअर सेंंटर करा, खासदार, महापौरांंकडे डावी लोकशाही आघाडीचे साकडे !

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. व तिसरी  लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी इंडिया सेक्युरिटी प्रेस नेहरू नगर नाशिकचे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करणे बाबत निर्णय घ्यावा, यासाठी डावी लोकशाही आघाडी नाशिक जिल्ह्याच्या वतीने खा. डॉ भारती पवार, खा. हेमंत गोडसे, नाशिक चे महापौर सतीश कुलकर्णी यांना निवेदन देऊन चर्चा केली. या वरती खा. गोडसे, खा. पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. महापौर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. 3 मे रोजी महापौर यांनी आयुक्त नाशिक मनपा च्या उपस्थितीत  खा. गोडसे, खा. डॉ पवार यांची बैठकघेण्याचे निश्चित केले आहे.

 

नाशिक शहरात मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. नाशिकरोड परिसरात ही मोठी संख्या आहे. बिटको रुग्णालय वर ताण येत आहे. नाशिक शहरातील वाढती रुग्ण  संख्या पाहता मोठ्या संख्येने  आरोग्य सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. केंद्र सरकारचे कर्मचारी, कामगार विविध आस्थापनेत मोठ्या संख्येने करत आहेत. नाशिक शहरात असलेल्या आरोग्य सुविधा वर मोठा ताण शहर, ग्रामीण, व पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा पडत आहे. नेहरू नगर येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस चे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल करावे, तिथे असलेली उपलब्ध मूलभूत सुविधाचा वापर रुग्णासाठी होऊ शकतो, असेही म्हटले आहे.  

केंद्र सरकारकडून ऑक्सिजन पुरवठ्याची हमी घेऊन करून कोविड हॉस्पिटल सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणी डावी लोकशाही आघाडी च्या वतीने 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अँँड तानाजी जायभावे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड राजू देसले, शेतकरी कामगार पक्षाच्या ऍड. मनीष बस्ते, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे गणेश  उनव्हाणे यांंनी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय