पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आषाडी वारी निमित्त पायी दिंडीतील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम रहावे व त्यांच्या आरोग्यसेवा व्यवस्थापनास भरीव मदत म्हणून विश्व् हिन्दु परिषदेच्या वतीने गेली 35 वर्ष मोफत औषधे सेवा दिली जाते. पुणे ते पंढरपूर अशी निरतर औषधे सेवा दिली जाते. या सेवेत मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य मेडिको ग्रुप व लोकसहभागातून गेल्या 13 वर्षांपासून मोफत औषधे दिली जातात. या वर्षी सुद्धा लोकसहभागातुन या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यासाठी मोफत औषधे देण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव:मधुकर बहिरू बच्चे यांच्या हस्ते विश्व् हिंदू परिषद् पदाधिकारी यांच्याकडे औषधे सुपूर्द करण्यात आली. या वेळी पोपट बच्चे, रोहिणी बच्चे, मारुती हाके, अर्चना बच्चे, गणेश बच्चे, काजल बच्चे, निलेश गाडगे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे, राहुल शालिग्राम, राघोबा देसाई, सुभाष पाटील, डॉ.अस्मिता वैद्य, ढेकणे ,कल्पना यंधे, उत्तम विटुळे, कल्पना पवार, सुहास काजवडेकर, विवेक पवार, मनोज भिवरे, प्रिया भिवरे आदिनी या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले.
डॉ., फार्मासिस्ट, स्वयंसेवक, अंबुलन्स, आदी या उपक्रमास पंढरपूर पर्यंत सेवा देतात.यशवंत देशपांडे, भास्कर गोडबोले, विजय लोंढे, डॉ.चंद्रकांत आडूर्, हर्षद जाधव, विजय देशपांडे, आदिनी मधुकर बच्चे युवा मंच कडून औषधे स्वीकारली. शुगर, बीपी, सर्दी, खोकला, ताप् जुलाब्, आदि साथीच्या आजारात् लागनारि औषधे व् प्रथमोपचार करिता लागनारि सर्व प्रकारची औषधे, तसेच साबणं, बिस्कीटआदी देण्यात आली. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव् मधुकर बच्चे यांनी प्रास्ताविक केले तसेच विश्व् हिंदू परिषद च्या सर्व टीम ला शुभेच्या दिल्या.
आजोळघरी माऊलींचे पालखी सोहळ्याचा पाहुणचार ; हरिनाम गजरात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे
पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता अभियान
PCMC-व्हिडीओ न्यूज : अक्षय भालेराव, गिरीधारी तपघाले हत्येचा निषेधार्थ विराट मोर्चा