Monday, May 20, 2024
HomeNewsउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक !

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक !

लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे..यावेळी त्यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) त्यांच्या सोबत आहेत.

डॉ. नरेश त्रेहन स्वतः ८२ वर्षांचे मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. अखिलेश यादव आणि अपर्णा यादव अचानक दिल्लीला आले आहेत.शिवपाल यादव आणि मुलायम यांचा दुसरा मुलगा प्रतीक यादव हे आधीच दिल्लीत आहेत.
22 ऑगस्टपासून मुलायम सिंह मेदांता रुग्णालयात दाखल झाले आहे.त्यांच्यावर कर्करोगतज्ज्ञ डॉ.नितीन सूद यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.काल (रविवारी) त्यांची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

रविवारी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.जिथे विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. प्रकृती गंभीर असून डॉक्टर सतत त्यावर लक्ष ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब खालावल्याचे दिसून आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय