Thursday, May 9, 2024
HomeNewsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी चौकशीनंतर सोडले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी चौकशीनंतर सोडले !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती.

ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या प्रकरणी आता लोणावळा पोलिसांनी अविनाश अप्पा वाघमारे (वय ३६ वर्षे) याला अटक करुन त्याची चौकशीनंतर सुटका केली आहे. पण याबाबत एक विचित्र माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश वाघमारे रविवारी (२ ऑक्टोबर) दुपारी लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला होता. त्याने हॉटेलमध्ये दारु प्यायली, पण नंतर दारुच्या नशेतच त्याने थंड पिण्याच्या पाण्याच्या बॉटलवरुन हॉटेल मालकाशी वाद घातला. तो पाण्यावरुन झालेल्या वादातून वाघमारेने हॉटेल चालकाला त्रास देण्याच्या हेतूने महाराष्ट्र पोलिसांच्या १०० या आप्तकालीन क्रमांकावर फोन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटा फोन केला. लोणावळ्यातील याच हॉटेलमधून वाघमारेने हा फोन केला.

याबाबत हॉटेल मालक किशोर पाटील यांनी हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली. वाघमारे (आरोपी) आमच्य हॉटेलमध्ये जेवला. त्याला थंड पाणी हवं होतं. पण त्यावेळी आमच्याकडे थंड पाण्याची बॉटल नव्हती. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याला हॉटेलमधील साधं पाणी घेण्याचा किंवा बाजूच्या दुकानातून थंड पाणी घेण्याचा सल्ला दिला. तो थोडा वेडसर असल्यासारखाही वागत होता. त्याने दारुही प्यायली होती. नशेतच त्याने हॉटेलचे फोटोही काढले. तो आरोही ट्रॅव्हल्सचा माणूस होता. त्यानंतर ट्रॅव्हल्सच्या चालकाचा क्रमांक घेतला आणि पोलिसांना दिला. पोलिसांनी त्याला नाशिक फाट्याला पकडलं.

पोलीस आणि हॉटेल चालकाला त्रास दिल्याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी वाघमारेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं. वाघमारे मूळचा घटकोपर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकरनगरमधील साठे चाळीतील रहिवाशी आहे. लोणावळा पोलिसांनी सोडल्यानंतर घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

दरम्यान, अविनाथ मानसिक दृष्ट्या अस्थिर असून त्याचं डोकं चालत नाही. तो खूप मद्यपान करतो. मामाचं निधन झाल्याने तो गावी निघाला होता. पण पाण्याच्या बाटलीवरुन काहीतरी वाद झाल्याने त्याने पोलिसांना खोटा कॉल केला, असं वाघमारेच्या पत्नीने माध्यमांना सांगितलं आहे. त्यानंतर मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याने पोलिसांनीही चौकशीनंतर त्याला सोडून दिलं आहे,”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय