Monday, May 20, 2024
Homeजुन्नरआदिवासी समाज लाचार नसून स्वाभिमानी… – शरद पवार

आदिवासी समाज लाचार नसून स्वाभिमानी… – शरद पवार

जुन्नर : जंगल वाचवण्याचं काम आदिवासी समाज करतो. जंगल वाचलं तर पाऊस येईल, पाऊस आला तरच जमीन टिकेल. आदिवासी समाजमुळंच पर्यावरण टिकून राहिलं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज आदिवासी समाजाला नक्षलवादी म्हटलं जातं. कसं काय तुम्ही नक्षलवादी म्हणता? आदिवासी समाजावर भूकबळी होण्याची वेळ येते आणि अत्याचार होतात आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केलीत. यातून तुम्ही लाचार नसून स्वाभिमानी असल्याचं स्पष्ट केलं आणि ज्यांनी जल, जंगल व जमीन वाचविली तो म्हणजे आदिवासी, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

आदिवासी विकास मंच व सह्याद्री बिरसा ब्रिगेड महाराष्ट राज्य यांच्या वतीने लेण्याद्री भक्त भवन येथे आदिवासी समाज प्रबोधन मेळावा व महादेव कोळी चौथारा अभिवादन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, आदिवासी तुम्हाला नक्षलवाद वाटत असेल तर तो तुम्हाला खुशाल वाटू द्या. ते त्यांच्या गरजांसाठी लढत असतात. आदिवासी समाजाच्या आंदोलनात असेच मोठ्या संख्येने सहभागी व्हा. जगात एकोप्याचा संदेश द्या, असे आवाहनही शरद पवार यांनी केलं.

शिवजन्मभूमीत गांधी जयंती दिवशी हा मेळावा घेतला त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो असेही पवार म्हणाले. काही लोक म्हणतात तुम्ही यांच्याशी जास्त संबंध ठेवता. तुम्हाला माहित आहे, हे नक्षलवादी आहेत. मी म्हणतो मला माहित आहे. पण हे कसले नक्षलवादी आहेत तर आम्ही कोणाला धक्का लावणार नाही, पण आम्हाला धक्का लावला तर आम्ही त्यास सडेतोड उत्तर देतो. असा हा नक्षलवाद असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांचा तीर कामठा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नरहरी झिरवळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व पुरवढा मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, सतीश पेंदाम आदींनी मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी आदिवासी वस्तूंचे प्रदर्शन, साहित्य व पुस्तक प्रदर्शन, मेडिकल कॅम्प, नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार, डॉ. गोविंद गारे सन्मान पुरस्कार, रूक्मिणी खाडे मातृशक्ती सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व्यक्तींचा जय पालसिंग मुंडा स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व पुरवढा मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, नंदुरबारचे आमदार अमशा पाडवी, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सुनिल भुसारा, बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष सतीश पेंदाम,आमदार दिलीप मोहिते पाटील, समता परिषद राज्य उपाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष डॉ. विनोद केदारी, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण पारधी, सह्याद्री मातृ शक्ती प्रमुख संगीता तळपे व आदिवासी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय