Sunday, May 19, 2024
HomeNewsमुंबईचा डबेवाला ठाकरे की शिंदे दसरा मेळाव्याला हजेरी लावणार ; तिढा सुटला...

मुंबईचा डबेवाला ठाकरे की शिंदे दसरा मेळाव्याला हजेरी लावणार ; तिढा सुटला !

मुंबई: शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे कोण कोणत्या दसरा मेळाव्याला हजेरीला लावणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. राज्यभरातून येणारा शिवसैनिक आपल्या दसरा मेळाव्याला (shivsena dasara melava Mumbai) उपस्थित राहावा म्हणून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट अशा दोघांकडूनही ताकत लावली जात आहे; मात्र मुंबई महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला (Shivtirtha Dussehra gathering ) हजेरी लावणार (Mumbai Dabewala will go to Shivtirtha) आहे.

शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर डबेवाले कामगारांमध्ये चल-बिचल निर्माण झाली होती; परंतु मावळ, मुळशी, खेड आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील बहुतांश डबेवाले (Mumbai Dabewala Shivtirtha) आणि डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Dabewala with Shivsena) यांच्यासोबत आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे (Mumbai Dabewala Association Shiv Sena) अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय