आंबेगाव : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वन विभाग जुन्नर वनपरिक्षेत्र घोडेगाव वन महोत्सव वृक्षारोपण कार्यक्रम 2022 अंतर्गत वनपरिमंडळ तळेघर, शिनोली, कानसे, तिरपाड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोखरी येथील श्री पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव एम.बी. गरगोटे, वनपरिमंडळ अधिकारी पी. पी. लांघी, वनपरिमंडळ अधिकारी जी. डी. इथापे, वनरक्षक एन. टी. दळवी, ए. एम. भवारी, ए.एच. घोडे, श्रीमती.एस.आर.सुपे, श्रीमती. एम. एस. काळे व वन कर्मचारी नाथा उगले, दत्ता गेंगजे, संजय तळपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, उपप्राचार्य प्राा. चेतन वानखेडे, कार्यक्रम अधिकारी प्राा. वैशाली कसबेेे, व्ही.एल. रोंगटेे, प्रा. धनंजय भांगरे, प्रा.धनश्री कोळगेे, प्राा. दीपिका खोब्रागडे कार्यालयीन अधीक्षक प्रा. एकनाथ साबळे, राजेंद्र जोशी, विठ्ठल कोळप, विशाल बेंडारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वन महोत्सवातून महाविद्यालय परिसर सुशोभीत तर होणारच आहे, परंतु आज काळाच्या ओघात वृक्ष संवर्धन करून वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. हा संदेश देण्यासाठी हा वन महोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. वनाधिकारी वनविभागात दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करतात वने तर हिरवीगार दिसलीच पाहिजेत परंतु गाव, गावाच्या भोवतालचा परिसर यांचे सुशोभीकरण केले पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वन विभागाने हा अभिनव उपक्रम महाविद्यालयााने राबवला.