Sunday, May 5, 2024
Homeग्रामीणजुन्नर : इच्छुक उमेदवारांच्या पदरी घोर निराशा, वातावरण थंडावले

जुन्नर : इच्छुक उमेदवारांच्या पदरी घोर निराशा, वातावरण थंडावले

जुन्नर : राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदांच्या निवडणूका जाहीर केल्या मात्र यात जुन्नर नगर पालिकेचा समावेश नसल्याने इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. जुन्नर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीची अंतिम मतदार यादी मंगळवार ता. ०५ रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीस जोरदार सुरूवात झाली होती. मात्र आता निवडणुक होणार नसल्याने राजकीय वातावरण थंड झाले आहे.

नगर पालिकेच्या प्रारूप मतदार यादीत २२ हजार २३६ मतदार होते. अंतिम मतदार यादीत एकूण २१ हजार ४१० मतदार असून यात १० हजार ८७७ पुरुष व १० हजार ५३३ महिला मतदार आहेत. प्रारूप यादीतील सुमारे २९६ मयत,९६ दुबार व उर्वरीत बाहेरचे असे एकूण ८२६ मतदार अंतिम मतदार यादी करताना कमी झाले असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे व निवडणूक विभागाचे बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.

अंतिम यादीत सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक दहा मध्ये २,५२५ तर सर्वात कमी प्रभाग तीन मध्ये १,६५५ मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीवर एकूण ३३७ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.

प्रभाग एक (१), प्रभाग दोन (६०), प्रभाग तीन प्रभाग (६१), प्रभाग चार (३०), प्रभाग पाच (१२), प्रभाग सहा (०), प्रभाग सात (६८),प्रभाग आठ (०४), प्रभाग नऊ (९८), प्रभाग दहा (०३) या हरकतीबाबत नगर पालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे केले, माहिती घेऊन जाबजबाब नोंदवले त्यांनतर योग्य ती कार्यवाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

प्रारूप मतदार यादीत सर्व नावे व्यवस्थित होती. हरकतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अंतिम याद्या प्रकाशित केल्या. मात्र, यामध्ये प्रभाग चार व दहा मधील अनेक मतदार कमी होऊन अंतिम मतदार यादीत अन्य प्रभागात गेले असल्याचे अकिफ इनामदार यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या दहा प्रभागाचे आरक्षण व एकूण अंतिम मतदार पुढील प्रमाणे :

• प्रभाग १ – अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,२२४.

• प्रभाग २ – अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,९५५.

• प्रभाग ३ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,६५५ .

• प्रभाग ४ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,५६६.

• प्रभाग ५ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,०५३.

• प्रभाग ६ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,८०८.

• प्रभाग ७ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण , एकूण मतदार २,३०३.

• प्रभाग ८ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार १,८१६.

• प्रभाग ९ – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,५०५.

• प्रभाग १० – सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, एकूण मतदार २,५२५.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय