Friday, November 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयFlood : केनियामध्ये 200 मिमी मुसळधार, पुरामुळे किमान 70 लोकांचा मृत्यू

Flood : केनियामध्ये 200 मिमी मुसळधार, पुरामुळे किमान 70 लोकांचा मृत्यू

नैरोबी : केनियातील मुसळधार पावसामुळे देशातील कमीत कमी 24 ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान होऊन पाच हजार जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

शुक्रवारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्या नंतर राजधानी नैरोबीतील रस्त्यावर महापूर येऊन वाहने वाहून गेली, यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने अथक प्रयत्न सुरू केले. किनारपट्टीचे शहर मोम्बासा आणि मंदेरा आणि वजीर या ईशान्येकडील शहरांना सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला आहे. Keniya flood

सरकारी अधिकारी आणि केनिया रेड क्रॉसच्या (Red cross ) म्हणण्यानुसार, केनियामध्ये चालू असलेल्या पुरामुळे राजधानी नैरोबी सह आसपासच्या परिसरात हजारो घरामध्ये पाणी शिरले.

एपी न्युज नुसार मृतांची संख्या 70 वर पोहोचली आहे, 24 एप्रिल 2024 च्या सकाळपर्यंत 15 हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. केनिया हा आफ्रिकेतील शेतीप्रधान देश आहे, उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय