Monday, May 20, 2024
Homeग्रामीणराज्य सरकारच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरा; राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची मागणी.

राज्य सरकारच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरा; राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची मागणी.

(प्रतिनिधी) :-  राज्य सरकारच्या सर्व विभागातील रिक्त पदांची भरती कोरोनाचे संकट संपल्यानंतर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

      निवेदनात म्हटले आहे की, करोना -१९ मुळे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. याची जाणीव राज्यातील युवकांना आहे. या सर्व युवकांची एक वर्षे विना पगारी नोकरी करण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे दाखविली आहे. तरी आपण कोरोनाचे संकट टळल्यानंतर राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागेची भरती करुन युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय