Friday, May 17, 2024
Homeजुन्नरऐतिहासिक नाणेघाट, किल्ले जीवधन येथे द्यावे लागणार उपद्रव शुल्क 

ऐतिहासिक नाणेघाट, किल्ले जीवधन येथे द्यावे लागणार उपद्रव शुल्क 

जुन्नर / शिवाजी लोखंडे : ऐतिहासिक नाणेघाट, किल्ले जीवधन येथे उपद्रव शुल्क द्यावा लागणार आहे. गेली 2 वर्षे कोविड 19 मुळे पर्यटनास बंदी होती, परंतु आत्ता बंदी उठल्यामुळे आहे हा उपद्रव शुल्क पुन्हा आकारण्यात येणार आहे.

गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा. या शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून येथील जैवविविधता जोपासण्यास व परिसर प्लास्टिक मुक्त ठेवण्यास मदत होणार आहे, हा उद्देश आहे. येथे मद्यपानाला बंदी राहणार असून अन्य पर्यटकांना त्रास होणार नाही यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांवर आळा बसणार आहे, असे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

यावेळी उपद्रव्य शुल्क आकारणीबाबत जुन्नरचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सूचना दिल्या आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा असे सांगितले.

उपद्रव शुल्काचे उद्घाटन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले. यावेळी घाटघर गावचे ग्रामस्थ, वनपाल शशिकांत मडके, वनपाल नितीन विधाटे वनरक्षक सचिन कवठे, वनसेवक मारुती साबळे, अशोक मुकणे, शिवाजी लोखंडे, पिलाजी शिंगाडे अधिक ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते. पर्यटकांनी उपद्रव शुल्क जमा करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय