Bird Flu : उरण तालुक्यातील चिरनेर गावात पसरलेल्या बर्ड फ्लूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे बाधित क्षेत्रातील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात आला. या मोहिमेदरम्यान दोन दिवसांत १,२३७ कोंबड्या खबरदारीचा उपाय म्हणून नष्ट करण्यात आल्या.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार (Bird Flu)
या मोहिमेमुळे बाधित झालेल्या ४३ शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बर्ड फ्लूच्या साथीने चिरनेर येथील तीन शेतकऱ्यांच्या १२० कोंबड्या दगावल्या होत्या. केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणीत या कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. बाधित क्षेत्र ९ फेब्रुवारीपर्यंत सील करण्यात आले होते.
या मोहिमेमुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळले असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती
महाराष्ट्रावर कर्जाच्या बोजा, सरकारच्या तिजोरीवर ₹ 96,000 कोटींचा भार
स्टाफ रूममधील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, संबंधित शिक्षक निलंबित
LIC कडे ₹880 कोटींची दावा न केलेली रक्कम; तुमची रक्कम असू शकते का?
पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचा शिरकाव, वाचा काय आहे नेमका आजार
जिओचा ग्राहकांना मोठा दणका, ‘हा’ प्लॅन 100 रूपयाने महागणार
धक्कादायक : ज्योतिबा डोंगरावर प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा, भाविकांच्या जीवाशी खेळ!
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !