नवी दिल्ली : भारतीय जीवन विमा निगम (LIC) कडे वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये तब्बल ₹880.93 कोटींची दावा न केलेली रक्कम असल्याची माहिती सरकारने संसदेत जाहीर केली आहे. या रकमेचा समावेश 3,72,282 पॉलिसीधारकांच्या परिपक्व पॉलिसींच्या लाभांमध्ये आहे. (LIC Unclaimed amount)
दावा न केलेली रक्कम म्हणजे काय? (LIC Unclaimed amount)
दावा न केलेली रक्कम म्हणजे LIC पॉलिसीधारकांनी त्यांच्या परिपक्व पॉलिसीचे लाभ तीन वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत मागवलेले नसल्यास ती रक्कम unclaimed मानली जाते. अशा प्रकारे लाभ वसूल करण्यासाठी, पॉलिसी धारकांनी योग्य ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते.
रक्कम तपासण्याची सोपी प्रक्रिया
LIC ने दावा न केलेल्या रकमेची माहिती तपासण्यासाठी एक सोपी ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे:
-LIC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या : https://licindia.in/home
-होमपेजवर “Customer Service” वर क्लिक करा.
-“Unclaimed Amounts of Policyholders” या पर्यायाची निवड करा.
-पॉलिसी नंबर, नाव, जन्मतारीख, आणि पॅन क्रमांक भरून तपशील सबमिट करा.
उपलब्ध रकमेची माहिती मिळवा.
दावा कसा करावा?
दावा फॉर्म मिळवा : हा फॉर्म LIC च्या कार्यालयातून किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतो.
कागदपत्रे संकलित करा : पॉलिसी दस्तऐवज, प्रीमियम रसीद, आणि मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
फॉर्म सादर करा : सर्व कागदपत्रांसह नजीकच्या LIC कार्यालयात फॉर्म सादर करा.
LIC तपासणीनंतर दावा मंजूर झाल्यास रक्कम जारी केली जाईल.
10 वर्षांनंतर रक्कम सरकारकडे हस्तांतरित
जर ही दावा न केलेली रक्कम 10 वर्षांपेक्षा जास्त काळ असेल, तर ती सीनियर सिटीझन वेलफेअर फंडमध्ये हस्तांतरित केली जाते.
नागरिकांनी काय करावे?
जर तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल, तर तत्काळ तिची स्थिती तपासा. दावा न केलेली रक्कम तुमची असण्याची शक्यता असू शकते. योग्य कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करून तुमचे हक्काचे पैसे मिळवा.
हे ही वाचा :
अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान
भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल
धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक