Home नोकरी मोठी बातमी : शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार...

मोठी बातमी : शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात, १५ हजार शिक्षकांची होणार भरती The second phase of teacher recruitment has started, Teacher bharti

Pavitra Portal Registration : राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या (Teacher bharti) दुसऱ्या टप्प्याला २० जानेवारी २०२५ पासून अधिकृतपणे सुरुवात केली आहे. यासाठी पवित्र पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, शिक्षक होण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

शिक्षक भरतीसाठी मोठा टप्पा सुरू (Teacher bharti)

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करून गुणवत्तावाढ साधण्यासाठी शिक्षण विभागाने १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीची मागणी शासनाकडे केली होती. शासनाने या मागणीस मान्यता देत, संबंधित संस्थांकडून जाहिराती मागवल्या आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत रिक्त शिक्षक पदांसाठी पवित्र पोर्टलवर २० जानेवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यातील यशस्वी अनुभव

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यापूर्वी पहिल्या टप्प्यात २१,६७८ जागांची भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांतील उर्वरित १० टक्के रिक्त पदे, अपात्र ठरलेल्या, गैरहजर राहिलेल्या किंवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागा आणि इतर रिक्त जागा भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील.

महत्त्वपूर्ण सूचना आणि प्रक्रिया

दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी (Teacher bharti) शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२२ नुसार कार्यवाही केली जात आहे. पवित्र पोर्टलवर १४ जानेवारी २०२५ पासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा फायदा घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची भरती होणार आहे.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती

“शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळावे, यासाठी आमचा कायम आग्रह आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया जलद गतीने राबवली जाईल,” असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

अर्ज प्रक्रियेसाठी उमेदवारांना सूचना

शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अर्ज करताना योग्य कागदपत्रे आणि माहिती प्रदान करणे गरजेचे आहे. शिक्षक भरतीच्या या दुसऱ्या टप्प्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर होईल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा :

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर, पहा तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !

Exit mobile version