Tuesday, May 21, 2024
HomeNewsबास झाली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांनो खत खरेदी करताना तुम्ही जास्तीचे पैसे देत...

बास झाली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांनो खत खरेदी करताना तुम्ही जास्तीचे पैसे देत नाही ना? वाचा खतांचे दर.

देशातील शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जातात तसेच अनेक योजनाही राबवल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारकडून डीएपी आणि युरियाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.देशातील अनेक भागात डीएपी आणि युरियाच्या किमती वेगवेगळ्या आहेत. मात्र केंद्र सरकारने डीएपी आणि युरियाच्या किमती निश्चित केल्या आहेत. अनेकठिकाणी दुकानदार शेतकऱ्यांची फसवणूक करून जास्त किमतीने डीएपी आणि युरियाची विक्री करत आहेत.

शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खतांच्या किमती खूप वाढल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती कवडीमोल झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक नफा न होता शेतीचा खर्चच जास्त होत आहे.

रासायनिक खताच्या किमती अधिक असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खर्च जास्त आणि नफा कमी असे शेतकऱ्यांचे गणित झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.

IFFCO नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असली तरी, देशात किंमत स्थिर ठेवण्यात आली आहे. P&K आधारित खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी कंपन्यांना भरघोस सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुदानाशिवाय खतांच्या किमती

यूरिया – 2,450 रुपये प्रति बॅग (45 किलो)
NPK – 3,291 रुपये प्रति बॅग (50 किलो)
एमओपी – 2,654 रुपये प्रति गोणी (50 किलो)
डीएपी – 4,073 रुपये प्रति गोणी (50 किलो)

अनुदानासह खतांच्या किमती

यूरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)
एमओपी – 1,700 रुपये प्रति गोणी (50 किलो)
डीएपी – 1,350 रुपये प्रति गोणी (50 किलो)
NPK – 1,470 रुपये प्रति बॅग (50 किलो)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय