बारामती : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा २०२२ चा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेमध्ये शारदाबाई पवार विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी वसुधा गंगाधर फडतरे ( vasudha gangadhar fadake ) हिने १०० पर्सेन्टाईल गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
वसुधा ही एका शेतकरी कुटुंबातील असून तिने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता केवळ महाविद्यालयातील मार्गदर्शनाच्या आणि मेहनतीच्या आधारे हे यश खेचून आणले.
तसेच पायल शिंदे ९९.९४, राजेश्वरी तावरे ९९.९२, दिग्विजय रायते ९९.९२, वैष्णवी निगडे ९९.४४, अनंत काटे ९९.४०, शंतनु देशमुख ९९.३९, प्रणव कुंभार ९९.३७, शंतनु सस्ते ९९.२२, प्रतीक जाधव ९९.१९, अथर्व कुंभार ९९.११, हर्षदा बारसकर ९९.०२, प्राची डोंगरे ९९.०१ असे पर्सेटाइल गुण मिळवले. ( cet exam result 2022 )
कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध विषयतज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाइन परिक्षेचा सराव, जादा तासिका, शंका निरसन तासिका, ध्यान व योगा इत्यादि उपक्रम राबविले जातात. याचा तिला खूप फायदा झाला.
या यशाबद्दल तिचे व प्राध्यापकांचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, मुख्याध्यापक सुर्यकांत मुंढेव विभाग प्रमुख योगेश झणझणे यांनी अभिनंदन केले.
सोर्स : दैनिक प्रभात