Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयसिध्दू मूसेवालानंतर 'या' प्रसिद्ध रॅपरची गोळ्या झाडून हत्या

सिध्दू मूसेवालानंतर ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या झाडून हत्या

जॉर्जिया : अमेरिकेतील जॉर्जियामध्ये अटलांटा रॅपर ट्रबलची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील जॉर्जियामध्ये अटलांटा रॅपर ट्रबलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रॅपर ट्रबलचे खरे नाव मारिएल सेमोंटे ओर आहे. रविवारी पहाटे 3:20 वाजता लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय रॅपरचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. शरीरावर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ट्रबलला जागीच मृत घोषित करण्यात आले. रॅपरच्या खून प्रकरणातील संशयित मिशेल जोन्सच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणाला अटक किंवा कोणतीही कारवाई झालेली नाही.

सांगण्यात येत आहे कि, मृत रॅपर ट्रबल कॅम्पसमध्ये राहणाऱ्या गर्ल फ्रेंडला भेटण्यासाठी जात होता. हत्येमागे गर्लफ्रेंडचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

ट्रबलची पहिली मिक्सटेप 17 डिसेंबर 2011 रोजी रिलीज झाली. यानंतर त्याची कारकीर्द सुरू झाली आणि 2018 साली त्याने त्याचा पहिला अल्बम एडवुड रिलीज केला जो अभिनेता ड्रेकवर चित्रित करण्यात आला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय