Sunday, May 5, 2024
Homeबॉलिवूडसलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्रावर लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्रावर लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रामुळे खळबळ उडाली होती. आता या पत्राबाबत लॉरेन्स बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे.

सिद्धूच्या हत्येनंतर सहा दिवसांनी सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते, त्यावेळी ते एका बेंचवर बसले असता त्यांना धमकीचे पत्र मिळाले. या पत्रात सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पत्रानंतर सलमान खानची सुरक्षा वाढविण्यात आली. या पत्रामागे लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) असल्याचा संशय पोलीसांना होता. मात्र, पोलीसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असता ‘सलमान खानला मिळालेल्या धमकीच्या पत्रामागे आपला हात नसल्याचा दावा केला आहे’. त्यामुळे हे पत्र नेमके कुणी पाठवले असावे याचा शोध पोलिस घेत आहेत.

अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्यापासून मुंबईसह दिल्ली पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांची आठ पथके सातत्याने तपास करत आहेत. वांद्रे परिसरात लावण्यात आलेले 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या धमकीच्या पत्राप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

मोठी घोषणा : बारावीच्या निकालाची तारिख जाहीर, ‘या’ तारखेला असा पहा निकाल !

भाजप प्रवक्त्याच्या ‘त्या’ एका चूकीमुळे आखाती देशांमध्ये भारतीय उत्पादनावर बंदी

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय