पुणे : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जन आरोग्य मंच पुणे व निनाद फाऊंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जाधवनगर, रायकर मळा रोड, धायरी, पुणे येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरास आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.अनेक रुग्णांनी या शिबिरात सहभागी नोंदवुन तज्ञ डॉक्टर्स कडून तपासणी, उच्च रक्तदाब,आॅक्सिजन सॅचुरेशन, रक्तातील साखरेचे प्रमाण ईत्यादि आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
विशेष लेख : कॉ. कृष्णा देसाई हत्या…शिवसेना अशी वाढली : सुबोध मोरे यांचा सणसणीत लेख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी
या शिबिरात जन आरोग्य मंच पुणे चे डॉ. किशोर खिल्लारे, हृदयरोग व मधुमेह तज्ञ, डॉ.जितेंद्र शिंदे फॅमिली फिजिशीयन, डॉ.सारिका शिंदे स्त्रीरोग तज्ञ व विद्या जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहभागी झाले होते.
या शिबीराचे आयोजन निनाद फाऊंडेशनचे अजय भोसले, भाग्यश्री बोराटे, सचिन खडके, वैभवी सोनवणे, सुयश यादव व श्रेया साबळे ह्यांनी जन आरोग्य मंच पुणे ह्यांनी ह्या मोफत आरोग्य शिबीर चे आयोजन केले होते. शिबिराचे व्यवस्थापन डॉ.किशोर खिल्लारे अध्यक्ष, जन आरोग्य मंच पुणे यांनी केले
– क्रांतिकुमार कडुलकर
विशेष : आंतरजातीय विवाहाचा नाशिक मध्ये गोड शेवट