पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी केली आणि नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “पाणी सोडताना लोकांना माहिती द्यायला हवी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाणार याची लोकांना कल्पनाही नव्हती,” असे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील परिस्थितीकडे लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच, पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही पुण्यात धरण वाहिलं, अशी टीकाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील पूरस्थितीवर बोलताना राज्य सरकारवर आणि अजित पवार यांच्यावर केली.
धरणातील पाणी सोडल्यामुळे पुण्यात अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
Raj Thackeray
राज ठाकरे म्हणाले की, “मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला, मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी सांगतो आहे त्याचं हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून विकास योजनांचे आराखडे येतात, पण टाउन प्लॅनिंगची काहीही गोष्ट नसते.”
हेही वाचा :
शासकीय, निमशासकीय विभागात विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
धक्कादायक : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून ; आरोपीला अटक
अत्तर व्यवसायिकाच्या गाडीने तरुणाला उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन
ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’