Thursday, March 20, 2025

ममता निवडणूक हारल्या तरी अशा होणार मुख्यमंत्री ; “हा” आहे नियम

कोलकाता : देशातील पाच राज्यांचे निवडणुक निकाल जाहीर झाले आहेत. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस समोर भाजपचे कडवे आव्हान असताना देखील दणदणीत विजय मिळवला मात्र नंदीग्राम मतदार संघात ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला.

सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये कडवी लढत बघायला मिळत होती. मात्र या अटी तटीच्या लढाईमध्ये अखेर तृणमूल काँग्रेसने २१३ जागा जिंकून आपला विजय मिळवला परंतु भाजपला ७७ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी एकेकाळीचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि नंतर मध्ये भाजपमध्ये गेलेले सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे ममता आणि तृणमूलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?

ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदार संघातुन पराभव झाल्यामुळे ममता मुख्यमंत्री कशा होणार हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य असणे गरजेचे असते. तसेच सहा महिन्यांच्या आत दोन्ही पैकी एका सदनचा सदस्य होणे आवश्यक असते अन्यथा मुख्यमंत्री पद सोडावे लागते. 

मात्र, पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नसल्याने तृणमूल काँग्रेसच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागेल आणि त्या जागेवरून ममता यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा सदस्य व्हावे लागणार आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles