पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर व शहरप्रमुख निलेश तरस यांच्या नेतृत्वात प्रशांत कडलग यांच्या कार्यालयात शिवसेना पक्ष आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी सांगवीतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
बैठकी दरम्यान जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर व शहरप्रमुख निलेश तरस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र विकासासाठी ज्याप्रमाणे अहोरात्र मेहनत घेत आहेत ज्याची दखल पूर्ण महाराष्ट्र घेत आहे व त्याचबरोबर मावळचे खासदार बारणे यांनी गेली दहा वर्षे केलेल्या कामगिरीचा ठसा दिल्ली पर्यंत उमटवला याची अनेक उदाहरणे देऊन कार्यकर्त्यांना प्रेरित केले व अनेक तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतला. पक्षाची जबाबदारीची पदे देऊन सन्मान होईल व त्याच बरोबर लवकरात लवकर शिवदूत, बूथ प्रमुख नेमण्याचे आवाहन केले. राज्यशासनाच्या विविध क्षेत्रातील कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास आवाहन केले.
शहरातील प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. ज्यामध्ये प्रशांत कडलग, रवींद्र ब्रम्हे, भेगडे साहेब, अॅड. प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नेते ढोबळे साहेब, डोईफोडे साहेब, पोर्णिमा आमराव, शिल्पाताई देशमाने, प्रवीण खडसे, राजेश बोचरे इ. मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यांची नावे खालीलप्रमाणे :
अविष्कार मोरे, वेदांत नांदगावकर, हर्षल आवरी, सुजल पाटील, दर्शन भगत, आदर्श मोलावडे, प्रणव रोकडे, रजत दळवी, झैद शेख, क्रिश पाटील, तन्मय निकाळजे, ऋतुपर्ण कडलग, प्रणव ढोरे, यश कांबळे, निखिल मस्के, सोहम पुणेकर, रोहन जाधव, अजय हाटे, रोहित कांबळे, साई पटोले, शुभम जाधव, चैतन्य अहिरे, अभिषेक चव्हाण, प्रणय पवार, मयूर रासकर, रामचंद्र सावंत, अभिषेक पाटील, अनिकेत तुपे, सौरभ गायकवाड, आदित्य पवार, प्रणव ढोरे, योगेश गरुड, उत्कर्ष गागरे, हर्ष पडवी, प्रतीक सोनावणे, हर्ष ठाकर, अनिकेत ढोरे, निखिल बर्डे, रोहित तळपे, शुभम मदने, आदित्य देशपांडे, देवेश चव्हाण,ओंम अवचट, किशोर चतुर्भुज, दिपक रणपिसे, विनय निकाळजे व त्याचबरोबर ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.